समाजसेवक राहुल देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल मंदिर प्रभागातील बालाजी वार्ड येथे हनुमान मंदिरात प्रभागातील सर्व जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यात अनेक सर्वसामान्य व सर्वांनीच याचा लाभ घेतला. राहुल देवतळे हे समाजासाठी उत्कृष्ट काम करत असून प्रभागातील शेकडो जनतेने देवतळे यांचे भरभरून कौतुक केले.याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक जयस्वाल, माजी उपाध्यक्ष अरुण बुरडकर , बिंदूबाबू बडकेलवार, धना येरेवार, वसंता पवार, शहर महासचिव सुहास पिंगे, अरुण गरगेलवार सुरेश थोरात , संजय जिझीलवार आदी मान्यवर उपस्थित होते. या आरोग्य शिबिरांचा मोठ्या संख्येने वार्डातील नागरिकांनी लाभ घेतला.
