रवि वाळके /दे दणका न्यूज मूल
सर्व धर्म समभाव प्रबोधनात्मक मंडळ देवाडा खुर्द च्या वतीने सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम खास महिला दिनाचे ओचित्य साधुन आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास मोगरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जाम तुकुम चे सरपंच भालचंद्र बोदलकर , नवेगाव मोरे येथील सरपंच जगदीश शेमले, ग्राम विकास अधिकारी दिलीप शिंदे, रेखाताई बुरांडे, वेणूताई भुरसे, विनायक बुरांडे,
सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पब्बावार, वासुदेव पाल आदी उपस्थित होते. यावेळी सत्यपाल महाराज कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला प्रबोनात्मक संदेश देऊन जनजागृती केली. या कार्यक्रमाला २ हजार महिला व पुरुषाची उपस्थिती होती.
