जानाळा येथे घरा शेजारी बिबट्याचा धुमाकूळ



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 
 तालुक्यातील जानाळा येथील जुन्या वस्तीतील 
अविनाश गजानन ताकसांडे यांच्या घरा जवळ 
गेल्या १५ दिवसापासून  बिबट्या येऊन धुमाकुळ घालत आहे. एके दिवशी अविनाश ताकसांडे यांचा मुलगा त्रिरतन वय (१४ वर्ष) हा घराजवळ खेळत असताना बिबट्या दिसला. त्यामुळे सर्व जण घाबरून गेले. याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले. त्यावेळी दोन दिवस वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवून बिबट्याला हाकलून लावले. असे असले तरी भर वस्तीत बिबट्याचा वावर जनतेला धोक्याची चाहूल देत आहे. त्यामुळे काही अनर्थ घडण्याची शक्यता वाटत आहे.त्यामुळे वनविभागाने बिबट्याला हाकलून लावण्याची मागणी अविनाश ताकसांडे व परिसरातील जनतेनी केली आहे.