मेंढपाळ व गावकऱ्यात भीतीचे वातावरण
रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
वाघांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत असल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र मूल व सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावात दिसुन येत आहे. काल दिनांक ७ मार्च ला मूल जवळील एम. आय. डी. सी.परिसरात निलेश दुर्गा कोरेवार( वय ३९ वर्ष) रा. चांदली बूज. या मेंढपाळा वर वाघाने हल्ला करून ठार केले. तीच चर्चा असताना मूल शहरापासून सोमनाथ मार्गांवर अगदी हाकेच्या अंतरावर शेतात रात्री मुक्कामी असलेल्या शेळ्या मेंढ्याच्या कळपावर हल्ला करीत मेंढपाळ मल्लाजी येगेवार(वय 60) रा. मूल यास देखील ठार केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.
दोन दिवसात लागोपाठ दोन मेंढपाळावर हल्ला करून ठार केल्याने मूल व सावली वनपरिक्षेतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेंढपाळावर वाघ हल्ला करीत नाहीत हा गैरसमज खोटा असल्याचे या निमित्याने दाखवुन दिले आहे.दिवसेंदिवस वाघांचे वाढते हल्ले चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे अतिरिक्त असलेल्या वाघांना इतरत्र हलवून निरपराध लोकांचे जाणारे बळी थांबविण्याची मागणी जनतेनी केली आहे.
