मूल बस आगाराची समस्या ४० वर्षांपासून जनतेला प्रतिक्षाच!



10कोटी निधी आला मात्र खर्चाचे काय? जनतेचा सवाल !


रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

 दळण वळणाची सोय जनतेला उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या ४० वर्षांपासून मूल वासियाचा संघर्ष सुरू आहे. अनेक राजकिय पक्षाच्या नेत्यानी आंदोलने केली त्या मागचे चिमूर आगर झाले माञ मूल आगाराचे सप्न आजही अधांतरी दिसत आहे.चंद्रपूर-गडचिरोली या दोन्ही जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मूल शहरात बस आगाराची निर्मितीसाठी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. यासाठी मूल शहर विकासाच्या आराखड्यात जागा देखील आरक्षित ठेवण्यात आली आहे. दररोज बसच्या फेऱ्या इतर तालुक्यापेक्षा जास्त असुन जास्त महसुल देणारा तालुका म्हणून शासन दरबारी नोंद आहे.असे असताना देखील मूल आगाराची समस्या गेल्या ४० वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या आगारासाठी १० कोटी रुपये एस. टी.महामंडळाकडे उपलब्ध झाले असले खर्चाचे काय ? असा सवाल जनतेनी उपस्थित केला असुन आहाराचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी जनतेनी केली आहे.
  
मूल तालुका राजकिय दृष्ट्या संवेदनशील म्हणुन ओळखला जात असुन मूल शहरातील
वाहतूक महत्वाची मानली जाते. मूल येथे उत्पादित होणारा तांदूळ देशातील अनेक राज्यात जात असल्याने दळणवळणासाठी येथील मार्ग परिचित आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या मध्यभागी असणारे हे शहर व्यापारी दृष्टीकोनातुन सकारात्मक असल्याने दळणवळणाला वाव आहे. बसस्थानकातुन दरदिवसा सुमारे ६३० बसफेऱ्या होत असतात. दररोज शेकडो प्रवाशांचे आवागमन असणाऱ्या येथील बसस्थानकात गडचिरोली आणि चंद्रपूर सोबतच ब्रम्हपूरी,चिमुर आगारातील बसेस प्रवाशाना सेवा पुरवित असतात.एखादे वेळेला मार्गात बस बंद पडल्यास बदली बस करीता गडचिराली अथवा चंद्रपूर आगाराकडुनच बस मागवावी लागते. यात प्रवाशांच्या वेळेचा खेळखंडोबा होतो. त्यामुळे मूल येथे बस आगार होण्यासाठी मागील सुमारे ४० वर्षापासून संघर्ष सुरू होता. आता त्याला फलश्रुती झाली असून १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र त्या निधीच्या खर्चाचे नियोजन होत नसल्याने निधी पडून आहे. नगर परिषदेने आगारासाठी जागा आरक्षीत देखील केली आहे.   
या मागणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधिनी उपोषण व आंदोलने केली होती. माञ शासन स्तरावरून कुठलीही हालचाल होताना दिसत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. आगाराची निर्मीती करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री स्व. वामनराव गड्डमवार ते विदयमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही लक्ष वेधले होते दळणवळणाला वाव असल्याने मूल येथे आगार निर्मितीचा प्रश्न सुटणे आवश्यक आहे.
गेल्या ४० वर्षांचा जटिल समस्या निकाली लागून जनतेला ये जा करण्याची सुविधा सुटेल व व्यापारी दृष्टीकोनातून दळणवळणाची सोय उपलब्ध होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.