75 लोकांचा दुर्धर आजाराचे सावंगी येथे पुढील उपचार होणार
रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे & जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यवतमाळ
व ग्रामपंचायत बोरचांदली यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक सेवा सुश्रुषा कार्यक्रम चंद्रपूर अंतर्गत सर्व रोग निदान व उपचार शिबिर नुकतेच मुल तालुक्यातील बोरचांदली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी यशस्वीपणे पार पडले.
या शिबिरामध्ये नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग,त्वचारोग, इत्यादी आजारांची तज्ञ डॉक्टरांकडून 591 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 172 जेष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेबाबत मार्गदर्शन वैद्यकीय समाजसेवक श्री. गंगाधर तडस यांनी केले.
या शिबिरासाठी सरपंच ललिता
सेमस्कर, उपसरपंच हरिभाऊ येनगंटीवार, जिल्हेवार सर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान तर्फे सहा. प्रकल्प समन्वयक डॉ. प्राजक्ता इंगोले, विराज घडसे, तालुका समन्वयक अनूप
नंदगिरवार, धनंजय लोखंडे, स्वयंसेविका सपनाताई नरेड्डीवार पूर्णवेळ उपस्थित राहून सहकार्य केले.
