निरोगी, बलशाली व ज्ञानाने स्वयंपूर्ण युवापिढी देशाचे खरे वैभव : हंसराज अहिर



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

 भविष्यात. संस्कारक्षम पिढी 
घडविण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून कबड्डी, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॉस्केटबॉल व अन्य खेळांना महत्व देत क्रीडा संकुल, विसापूर येथे २६ वे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजनात २३ विद्यापीठांचे सुमारे ४ हजार खेळाडू सहभागी झाले हे स्तुत्य असुन निरोगी, बलशाली व ज्ञानाने स्वयंपूर्ण युवापिढी देशाचे खरे वैभव आहे. असे मत कार्यक्रमाच्या समारोपिय कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली. 
ते पुढे म्हणाले की, अशा आयोजनातून विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचे प्रदर्शन करण्याची मोठी संधी प्राप्त होते. माननिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी खेळाला राजाश्रय मिळवून दिल्याने आज भारतीय खेळाडू विविध क्रीडा प्रकारातून देशाची मान उंचावण्यास समर्थ ठरल्याचे आपण बघतोय. त्यांनी योगविद्येला जागतिक स्तरावर नेत आंतरराष्ट्रीयत्व बहाल केले. अग्नीवीर ही संकल्पना सुध्दा त्यांच्या दूरदृष्टीची परिचायक आहे. देशाच्या संरक्षणाकरिता बलशाली, युवाशक्तीची गरज आहे. तिच संकटावर मात करू शकेल. याप्रसंगी सर्व खेळाडूंचे स्वागत करीत विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. उत्कृष्ट आयोजनाबद्दल विद्यापीठास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास आमदार सुधाकर अडबाले, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे. प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे, डॉ अनिल हिरेखन, डॉ अनिता लोखंडे, डॉ. शाम खंडारे, डॉ. रेड्डी, डॉ. माने, डॉ. चक्रवती, माजी उपमहापौर अनिल फुलझले, दिलीप जयस्वाल, प्रभुती उपस्थित होते.