रुग्णसेवा करण्याचे भाग्य लाभणे हीच खरी ईश्वरीय संधी : आमदार देवराव भोंगळे


गोंडपिपरी येथे पार पडले महाआरोग्य शिबीर 

रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 


देव देवळात नाही तर माणसात आहे. समाजातील रंजल्या-गांजल्यांची सेवा करण्यासारखे पुण्य नाही असा संदेश देत मानवसेवेचे मुल्य पटवून देणाऱ्या वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांच्या जयंतीदिनी आजचे भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न होत आहे. याचे मनस्वी समाधान वाटते. आजच्या शिबीराचा २४७६ शिबीरार्थींनी लाभ घेतला आणि ईश्वराचा अंश असलेल्या गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची ही ईश्वरीय संधी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला लाभली हे मी माझे भाग्य समजतो. असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी गोंडपिपरी येथे आयोजित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, दंतरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग, त्वचारोग, मेडीसीन व कॅन्सर यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांनी शिबीरार्थींची तपासणी केली. यामध्ये तपासणी झालेल्या २४७६ रुग्णांपैकी ८१२ रूग्ण हे विविध शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले. त्यांचेवर टप्प्या-टप्प्याने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे शस्त्रक्रिया होणार असून ४० शिबिरार्थींची रुग्ण तुकडी रवाना करण्यात आली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे शिबीर प्रमुख डॉ. ठाकरे, भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या लता जांभूळकर, तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. धात्रक, जिल्हा उपाध्यक्ष बबन निकोडे, तालुका महामंत्री गणपती चौधरी, निलेश पुलगमकर, सतीश वासमवार, शहर अध्यक्ष चेतन गौर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राकेश पुन, सुहास माडुरवार, दिपक बोनगिरवार, स्वप्नील अनमुलवार, वैद्यकीय अधिकारी कमलेश पिल्लेवाड, रुग्ण संपर्क अधिकारी एन.पी.शिंगणे, स्वाती वडपल्लीवार, वैष्णवी बोडलावार, अरुणा जांभूळकर, अर्चना भोंगळे, निलेश संगमवार,गणेश मेरुगवार, रमेश दिनगलवार, भानेश येग्गेवार, वैभव बोनगिरवार, सुरेखा श्रीकोंडावार, मनीषा मडावी, मनीषा दुर्योधन, संजना अम्मावार, मनोज वनकर, गणेश डहाडे, नितीन तूबडे, शैलेश विश्वकर्मा, सचिन पाल, शीतिल लोणारे, चंद्रकला भोयर, सपना तामगाडगे, रोशनी अनमुलवार, शुभांगी वनकर, तेजस्विता भगत, सचिन पाल, सचिन भोयर, अभिजित कोंडावार आदींनी परिश्रम घेतले.