बियर शॉपी झाले बारचे दुकान, शॉपीत आहे बियर पिण्याची खोली !




रवि वाळके/ दे दणका न्यूज मूल 
मूल शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात देखील बियर शॉपीचे दुकान वाढत चालले आहे. बियर शॉपीमध्ये फक्त बियर विकण्याचा परवाना आहे. बियर पिण्याचा नसताना देखील बियर बार सारखी खोली तयार करून बार दुकानासारखे प्राशन ग्राहक करीत असल्याचे दिसते. बियर शॉपी दुकानदार पैसे कमविण्याचा नादात शासनाच्या नियमाला तिलांजली देत आहे. याकडे उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूरचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करीत असल्याने याबाबत चौकशी करून बियर शॉपी परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    शासनाने महसूल वाढविण्याच्या दृष्टीने देशी दारू व बियर बार दुकानासारखे बियर शॉपीचा परवाना देण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे मूल शहरासह  मूल तालुक्यातील ग्रामीण भागात देखील बियर शॉपीचे दुकान पानठेल्याप्रमाणे वाटप केले जात आहे. असे असले तरी त्याला नियम व अटी आहेत. मात्र बियर शॉपी दुकानदार दिलेल्या वेळे पेक्षा अगोदरच दुकान उघडले जात असल्याचे दिसून येते. तसेच बियर पिण्याचा परवाना दिला आहे.ग्राहकांनी इतरत्र ठिकाणी ते प्राशन करावे असा नियम असताना मात्र त्याच बिअर शॉपीत एक खोली तयार केली गेली आहे. त्यात हॉटेल प्रमाणे बसुन बिअर प्राशन ग्राहक करताना दिसतात. त्यामुळे दिवसेंदिवस ग्राहकांची गर्दी वाढुन अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी दारू उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूरने लक्ष घालुन अवैध रित्या खोलीत बसुन पाजणाऱ्या बिअर शॉपीचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.