मूल तालुक्यात चोरबिटीची लागवड करणाऱ्याच्या संख्या वाढली!


कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज 



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

मूल तालुक्यात    आंध्रप्रदेशातील रविकुमार गोटेपट्टी हा इसम 
  जुनासुर्ला येथे  बस्तान मांडत शेतकऱ्याच्या शेतजमिनी  भाडेतत्वावर  घेणे व शेतात चोरबिटीची लागवड करणे गेल्या पाच वर्षांपासून करीत आहे . जमिनीच्या मोबदल्यात अनेक शेतकरी पैशाच्या लालसेने आपल्या जमिनी भाडे तत्वावर देण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे चोर बिटीची लागवड करून शेती नापिक करु पाहणाऱ्या अशा व्यक्तीचा शोध घेऊन मुसक्या आवळण्याची मागणी करीत कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


    मूल तालुका धानाचे पिक घेणारा तालुका म्हणुन ओळखला जातो. येथील तांदुळ मुंबई, पुणे शहरसोबताच इतरही राज्यात पाठविला जातो. माञ धानाचे उत्पादन व त्यावर खर्च बघता बहुतांश शेतकरी धान पिकविण्याच्या मनःस्थितीत नसल्याचा फायदा आंद्रप्रदेशातील रविकुमार गोटेपट्टी (रेड्डी) व इतर व्यक्ती 
 मूल तालुक्यातील अनेक  गावात जाऊन शेतकऱ्यांना जमिनीचा जास्त मोबदला देत जमिनी भाडेतत्त्वावर घेऊ लागला. त्या जमिनीत शासनाने बंदी घाललेल्या चोरबिटीची लागवड करून लाखोच्या उत्पन्न मिळत असल्याने  बोरचांदली, चांदापूर, बेंबाळ, जुनासूर्ला व इतरही गावात देखील जमिनी घेवुन बस्तान मांडले. चोरबिटीच्या लागवडीने जमिनी नापिक होत असल्याने शासनाने बंदी घातली. माञ सदर इसम खुलेआम हा प्रकार करीत आहे  चंद्रपूरच्या गुण नियंत्रक पथकाने २० फेब्रुवारी २४ ला चांदापुर येथील शेतात धाड ९ लाख ४८ हजार रुपयांची चोरबिटी पकडुन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असलाच प्रकार तालुक्यातील अनेक गावात सुरू असुन शेतकऱ्याच्या  जमिनी नापीक करु पाहणाऱ्या चोरबिटी माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.