वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक यांचे झाले दुर्लक्ष
रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्वाची भुमिका पार पाडत असतात हे हेरून वृक्ष लागवडीचा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेत मूल शहरानजीक कक्ष क्रमांक ७५२ मध्ये सन२०१९ ला ३o हेक्टर जागेत ३३ हजार झाडे लावण्यात आली. ५ वर्षात झाडांच्या वाढीसोबतच घनदाट जंगल निर्माण होणे अपेक्षित होते माञ वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष न घातल्याने झाडे मरणावस्थेत दिसत आहेत. यावरून जेव्हा कुपंनच शेत खात असेल तर दुसऱ्याकडून अपेक्षा काय करायची ? असा प्रश्न जनतेनी निर्माण केला असुन चौकशीची मागणी केली आहे.
वृक्षांचे संवर्धन झाले तर वन्य प्राण्यांचे अधिवास सुरक्षित होते. यासाठी वनविभाग वृक्ष संवर्धन करण्यासाठी दरवर्षी लाखो वृक्षांचे वृक्षारोपण केले जाते. ज्या जोशात वृक्षारोपण केले जाते त्याच तत्परतेने कर्मचाऱ्यावर जबाबदारी देवुन लावलेल्या सगळ्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी बाध्य करणे आवश्यक आहे. माञ असला प्रकार होत नसल्याने वृक्ष संवर्धन होत नसल्याची ओरड सुरू आहे.वन्यप्राण्यांचे अधिवास सुरक्षित राहावे यासाठी वनविभागाने लाखो रुपये मंजूर केले. मात्र तत्कालीन वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांच्या दुर्लक्षीपणामुळे मूल शहरानजीक असलेल्या कक्ष क्रमांक ७५२ मध्ये सन २०१९ ला ३० हेक्टर जागेत ३३ हजार लावलेली झाडे पूर्णतः करपली आहेत.यावेळी प्रत्येक झाडामागे तीन बाय तिन अंतर ठेवण्यात आले. यावेळी खड्डा खोदण्या पासुन तर झाड लावण्यापर्यत लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र वेळोवेळी वृक्ष संवर्धनावर लाखो रूपये खर्च करण्यात आला . आजच्या स्थितीत वृक्ष संवर्धन होऊन मोठ मोठी वृक्षे झाली असती मात्र तात्कालीन चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर व विद्यमान वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका येलमे यांच्या नियोजनाअभावी लाखो रुपये कागदावर खर्च करण्यात आल्याचा देखावा करण्यात आला. मात्र स्वतःचे पोट भरण्यासाठी हा प्रकार करण्यात आला असल्याचे बोलल्या जात आहे. पाच वर्षात ३३ हजार झाडापैकी बोटावर मोजण्याइतके झाडे शिल्लक असल्याचे दिसुन येते. जी जिवंत झाडे आहेत आहेत त्या सभोताल कचरा वाढलेला आहे माञ वन कर्मचारी झाडा समोरील कचरा काढण्याचे साधे सौजन्य दाखवीले नाही. त्यामुळे आजही फक्त गवत व कचरा वाढल्याचे दिसुन येत आहे. ३३ हजार वृक्षांपैकी बोटावर मोजण्या इतके झाडे असतील व त्यासाठी लाखो रुपये खर्च झाले असतील तर कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार असुन वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक यांचे दुर्लक्ष झाल्याने झाडे पूर्णतः करपली आहेत. याची चौकशी होणे आवश्यक आहे.
