शहराच्या वळणरस्त्यासाठी १३ शेतकऱ्यांची आडकाठी!

रवि वाळके /दे दणका न्यूज मूल 


मूल शहरातील येणाऱ्या वाहनाची गर्दी वाढली असुन सतत रेल्वे व मालगाडी येत असतात.त्यामुळे वाहनांची गर्दी शहराच्या बाहेरील मार्गाने वळविण्यासाठी ६.१७१ किलो मीटर रस्ता मंजुर करण्यात आला माञ १३ शेतकऱ्याच्या उदासीनतेमुळे भूसंपादनाची प्रक्रिया रगडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.भूसंपादनाच्या प्रकियेसाठी शेतकऱ्यांच्या अंतर्गत समेट घडुन येत नसल्याने रजिष्ट्री होत नसल्याचे दिसून येत आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाने नियमित शेतकऱ्यांशी संपर्क केल्याने ४ शेतकरी तयार झाले आहेत. या चार शेतकऱ्यांनी रजिष्ट्री केल्यास पुन्हा ९ शेतकऱ्यांची बाधा कायम राहणार असल्याने वळण रस्त्याची अडचण कायम आहे.

 
     मूल शहराची  लोकसंख्या सतत वाढत आहेत. त्यामुळे  मूल शहरात येणारी जड वाहने बाहेरील मार्गाने वळविण्यासाठी कर्मविर महाविद्यालय ते स्मशानभूमी जवळील चर्च पर्यत ६.१७१ किलो मिटर रस्त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या रस्त्यासाठी लागणारी १६.४५ हेक्टर शेतजमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया मागील दोन वर्षापासून सुरू आहे. यात ८७ शेतकऱ्याच्या शेतजमिनी बाधीत झाल्या आहेत. त्यांना योग्य मोबदला देण्यासाठी सार्वजानिक बांधकाम उपविभागाने  सतत मूल येथील  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याने आतापर्यंत ७४ शेतकऱ्याच्या शेतजमिनी रीतसर भुसंपादित करण्यात आल्या. गेल्या वर्ष भरात  १३ शेतकऱ्याच्या अंतर्गत आपसी समेट घडुन येत नसल्याने भूसंपादनाची प्रक्रिया रगडली . सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील काही महिन्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याने ४ शेतकरी रजिष्ट्री करण्यास तयार झाले आहेत. असे असले तरी ९ शेतकऱ्याच्या शेतजमिनी भूसंपादन करण्यास अडचण कायम राहणार आहे.आजच्या स्थितीत  २.०२ हेक्टर आर जमीन भूसंपादन होण्यास अडचण निर्माण होताना दिसत आहे. त्यामूळे  सार्वजानिक बांधकाम विभाग स्वतः पुढाकार घेऊन नियमीत भूसंपादनाची कार्यवाही करावी असे मत व्यक्त केले जात आहे. कारण वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता वळण रस्ता होणे आवश्यक झाले आहे. याकडे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष घालुन हा वळण रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी जनतेनी केली आहे.