गुन्हेगारी रोखण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या सर्व व्यक्तीची नोंद आवश्यक!



पोलिसांनी नियमित नोंद घेतल्यास परराज्याच्या व्यक्तीचा आकडा होईल निश्चित!

   

रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

   मूल तालुक्यासह शहरात देखील पर राज्यातील व्यक्ती कामाच्या शोधात मोठ्या प्रमाणात येत आहेत. येणाऱ्या व्यक्तीची पाश्र्वभूमी कशी आहे? याबाबत पोलिसांनी नोंद घेतल्यास कळु शकते. शहरातील 
 विविध ठिकाणी चरस गांजा गुटखा यांचा अवैध वापर आणि विक्री होत असल्याची चर्चा असल्याने या परप्रांतीयाची
असताना कामाच्या निमित्याने मूल शहरात परप्रांतीयांचे होत असलेले बस्तान बघता गुन्हेगारीचे मूळ उगमस्थान यातून दिसत आहे. मूल मध्ये विविध कामासाठी येणाऱ्या व्यक्तीची  संख्या दिवसागणिक वाढत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देणारी आहे.विविध  राज्यांचे लोक मूल शहरात येत असल्याने स्थानिक नागरिकांशी जुळवून घेत आपले प्रस्थ वाढवीत असल्याचे दिसून येते. मात्र परप्रांतीय कामगारांची संख्या पूर्वीपेक्षा किती वाढली याची पोलिस ठाण्यात नोंद घेतली जात नसल्याने त्यांच्या गुन्हेगारी गुन्हेगारी वाढण्यास वाव मिळत आहे. याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.



मूल शहर यापूर्वी शांत शहर म्हणून ओळखले जात होते. नवीन येणारा व्यक्ती मूल येथे कायम स्वरुपी वास्तव्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र 
 वाढत्या गुन्हेगारीकरणामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या होणा-या हिंसक घडामोडीमुळे तालुक्यात दहशतीचे चित्र तयार होत आहे. गुंडगिरी करणा-या युवकाचे टोळके पानठेल्यांवर बसून चिडीमारी करीत असल्याने त्यातून शहरातील वातावरण बिघडत चालले आहे. ठिकठिकाणी असणा-या शहरातील पानठेल्यांवर असे टोळके शिगारेट विकत विकत घेऊन त्यात गांजाचे धुरके सोडताना अनेकाच्या निदर्शनास येत आहेत.शालेय आणि महविदयालयीन मुलींना पाहून बाईक धुम स्टाईल पळविणे, अश्लील बोलणे, शाळा, महाविदयालय सुटण्याच्या वेळेस येरझारा मारणे अशा विविध कारणांमुळे गुंडगिरी वाढत चालली आहे. 
याकडे स्थानिक पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गुंडगिरी करणा-या युवकांची हिंमत वाढत चालली आहे. दिवसेंदिवस वाढणारी हिंमत गुन्हेगारीला खतपाणी घालत आहे .यात परप्रांतीयांचा येणारा लोंढा इतर युवकांना प्रोत्साहन दिले जात असल्याने खुनासारख्या घटनांना जन्म दिला जात आहे. मूल मध्ये मागील वर्षाचा मागोवा घेतला तर गुन्हेगारीचा वाढता आलेख दिसुन येते. यासाठी पोलिसांनी मूल शहरात विविध कामासाठी येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद घेणे आवश्यक झाले आहे. अन्यथा गुन्हेगारी वाढल्याशिवाय राहणार नाही. यासाठीपरप्रांतीयांची नोंद पोलिस ठाण्यात घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.