संस्कारक्षम पिढी घडविणे हे शिक्षकांच्या हातात : संतोषसिंह रावत



मूल येथे पार पडले तीन दिवसीय सुभाष उच्च प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन



रवि वाळके दे दणका न्यूज मूल 
  
आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने विद्यार्थ्यांत नवीन चैतन्य निर्माण करून आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम शिक्षक करू शकतात. संस्कारक्षम पिढी निर्माण करणे हे शिक्षकांच्या हातात आहे. यासाठी शिक्षकांनी विविध पैलूंचा वापर करुन विद्यार्थ्यांना घडवावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूरचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मूल येथे आयोजित सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून केले. यावेळी बक्षीस वितरक म्हणुन चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार होते. संदीप गड्डमवार यांनी या प्रसंगी माता पालकांचा सहभाग जिथे असतो ती शाळा व त्यातील विद्यार्थी चांगले घडतात. यासाठी शाळेने विद्यार्थ्यांसह पालकांना स्नेहसंमेलनात सहभागी करुन घेतले ही अभिमानाची बाब आहे. इतरही शाळांनी या शाळेचे अनुकरण करण्याचे आवाहन यावेळी केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार, सचिव अविनाश जगताप, माजी जिल्हा परिषद चंद्रपूरचे माजी सदस्य प्रमोद चिमुरकर, सामाजिक कार्यकर्ते निखिल सुरमवार, प्रकाश नंदाराम, गणेश मांडवकर, डेव्हिड खोब्रागडे ,ज्योती मोहबे, रोशनी लाटेलवार, राजू गेडाम आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी सुभाष उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने तिन दिवसीय विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात विद्यार्थ्यांसह माता पालकांचे नृत्य, वेशभूषा स्पर्धा, रांगोळी, संगीत खुर्ची,अंताक्षरी, कबड्डी, डॉस बॉल, खरी कमाई आदी कार्यक्रम घेण्यात आले. यात पालक व परिसरातील जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक राहुल मुंगमोडे , योगेश पुल्लकवार, बंडू अल्लीवर, रीना मसराम, अजय राऊत, निशा जगताप, संकेत जाधव, निखिता पोहणे, संध्या आभारे,चित्रा फलके, किर्ती मोकाशी व शाळेतील विविध समितीच्या पदाधिकारी,सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.