चिरोली ग्रामपंचायतीचे कंत्राटदाराकडे दुर्लक्ष
रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
शासनाने बळीराजा समृद्धी मार्ग शेत पांदण रस्ते अंतर्गत ग्राम पंचायत चिरोली च्या देखरेखी पांदण रस्त्याचे काम करण्यात करण्यात येत आहे. या रस्त्यावर टाकण्यात आलेला मुरूम माती मिश्रीत असल्याने रस्त्याच्या बांधकामाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पैसे कमविण्याच्या नादात माती मिश्रित मुरूमाचा नाममात्र मुलामा देत दिला जात आहे. माञ याकडे संबंधित कंत्राटदार ,ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे बळीराजा पांदण रस्त्याची योजना ससफेल ठरत असुन याकडे पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पंचायत समिती मूल अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत चिरोली च्या देखरेखी बळीराजा समृद्धी मार्ग शेत पांदण रस्त्याचे काम धोबी घाट चिरोली ते केळझर रस्त्याचे काम ३१ लाख ४७ हजार रुपये खर्च करून करण्यात येत आहे. पावसाळा व इतरही दिवसात शेतकऱ्यांना शेतात सोईने जाता यावे रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या अनुषंगाने कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र कंत्राटदार पैसे कमविण्याच्या नादात हलक्या दर्जाचे माती मिश्रीत मुरूम टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी ५० ते ६० ब्रास मुरूम रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला आहे. मात्र याकडे ग्राम पंचायत चिरोलीचे पदाधिकारी हेतू पुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याने कंत्राटदाराची हिंमत वाढली आहे. त्यामुळे कंत्राटदार माती मिश्रीत मुरूमाचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.यावरून कंत्राटदार , ग्राम विकास अधिकारी व पदाधिकारी यांचे साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे.शेतकऱ्यांना बारमाही ये जा करण्यासाठी मजबूत रस्ता बनविण्याचा प्रयत्न ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे असफल होत असल्याची चर्चा आहे. याकडे पंचायत समितीच्यासंबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेनी केली आहे.
