तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा प्रताप , चौकशीची मागणी
शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळावे यासाठी मूल तालुक्यातील बोरचांदली येथे तीन गॅबीयन बंधारे व माजगीची २६ शेतकऱ्यांची कामे
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम २.० अंतर्गत सन २०२३ - २४ या वर्षात तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूल च्या वतीने करण्यात आले. सदर बंधारे व
मजगीची कामे निकृष्ट झाले असुन यात तालुका कृषी अधिकारी, पर्यवेक्षक व कृषी सहाय्यकाचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत चौकशी करुन दोषी कर्मचाऱ्यांना विलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आली आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूल कडे कुशल तंत्रज्ञ नाही. विभागातीलाच कर्मचारी मोजमाप करून बिल अदा करीत असतात. केलेल्या कामाचा फलक देखील लावण्यात आला नाही. कुणाला माहीत होऊ नये यासाठी कामाचे फलक लावण्यात कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याची ओरड सुरू आहे.शासनाच्या करोडो रुपयांचा चुना लावुन देखील कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी पुन्हा नवीन कामात पुन्हा भ्रष्ट्राचार करण्यासाठी पुढे सरसावल्याचे दिसुन येत आहे. बोरचांदली येथील बांधलेल्या बंधाऱ्याची व केलेल्या मजगीच्या कामाची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर विलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री, कृषी मंत्री व कृषी आयुक्त यांचेकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
