रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चिचपल्ली अंतर्गत येणाऱ्या मूल वन परिक्षेत्रात
सन २०२३ -२४ या वर्षात वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रमाअंतर्गत मूल रेल्वे नजिक कक्ष क्रमांक ७५४ मधील १० हेक्टर मध्ये ११ हजार रोपे लावुन वृक्षारोपण करण्यात आले. मात्र एक वर्षातच सर्व लावलेली रोपे मरणावस्थेत झाले आहे . यासाठी कुंपणापासून तर रोपे लावण्यापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले. हा प्रकार बघता वृक्षारोपण चळवळ कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षीपणामुळे निरर्थक दिसत आहे.
लोकांना वृक्षांचे महत्व कळावे यासाठी वृक्षारोपण करून जनतेला ही लावलेली झाडे दाखवुन प्रोत्साहित करता येईल या उद्देशाने वृक्षरोपण करण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम वनविभागाच्या वतीने घेण्यात येतो.याच अनुषंगाने चिचपल्ली प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी अंतर्गत मूल परीक्षेत्रात रेल्वे स्टेशन नजीक कक्ष क्रमांक ७५४ मध्ये सन २०२३ ला १० हेक्टर जागेत ११ हजार झाडे लावण्यात आली. एका वर्षात झाडांच्या वाढ होणे गरजेचे असताना आणलेली रोपे कमकुवत असल्याने ती तग धरू शकली नाही. त्यामुळे रोपे करपली. त्याठिकाणी नैसर्गिक उगवलेली झाडे व गवतच मोठ्या प्रमाणात वाढले.वृक्षारोपणाचा कार्यक्रम निर्थक ठरू नये यासाठी पुन्हा १२०० रोपे सन २०२४ मध्ये लावण्यात आली. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने ती रोपे देखील कोमेजल्यागत दिसत आहेत. एकूणच लाखो रुपये खर्च करुन वृक्षारोपण करण्यात आले असले तरी आजच्या परिस्थितीत १० हेक्टर जागेत वाळलेले गवत व नैसर्गिक वाढलेली झाडेच दिसत आहेत. लावलेल्या ११ हजार रोपांचा लवलेश दिसत नसल्याने दिसुन येते. वृक्षारोपणाचा कार्यक्रम म्हणजे केवळ शासनाच्या लाखो रुपयाची उधळपट्टी असल्याचे दिसून येते. यात
दोषी कर्मचाऱ्यांकडून खर्च झालेल्या निधीची रक्कम वसुल करण्याची मागणी जनतेनी केली आहे.
