महिलांचे प्रमाण देखील वाढले
तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यावर शासनाने बंदी घातली असली तरी बेधडकपणे विक्री केली जात आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्याचे दिवसागणिक वाढतच असल्याचे दिसुन येत आहे. यात ग्रामीण भागात शहरासह घुटका खाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुख कॅन्सर बरोबरच इतरही आजार बळावत आहेत.त्यामुळे अनेक पुरुषा बरोबरच महिलांना या कॅन्सर आजाराचा विळखा घातला जात आहे. भविष्यात घरोघरी मुख कॅन्सर बरोबरच इतरही आजार वाढण्याची शक्यता असल्याने चिंतेची बाब ठरत आहे.
घुटक्यावर बंदी घालण्यात आली असताना देखील खुले आम विक्री केली जात आहे.
तंबाखूजन्य पदार्थ कायदा कलम चार अंतर्गत आरोग्य विभागामार्फत ५६६ लोकांवर ५५ हजार ३७० रुपयाचा दंड आकारण्यात आला. जिल्हा आरोग्य आरोग्य विभागामार्फत बारा हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे तसेच ७१९४ रुग्णांचे समुपदेशन करण्यात आलेले आहे.पोलीस विभागातर्फे २०७६ केसेस वर ४ लाख १५ हजाराचा २०० दंड आकारण्यात आलेला आहे. मागील वर्षी अन्न व औषधी प्रशासन तर्फे १५ ठिकाणी धाडी टाकून एक करोड ४४ हजाराचा रुपयाचा घुटका जप्त करण्यात आला आहे.मूल शहर व तालुक्यात देखील धाड टाकून लाखो रुपयांचा घुटका जप्त करून आरोपीला देखील अटक करण्यात आली. एवढे झाले असताना देखील तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसुन येत आहे . घुटक्याची तस्करी करणारे महाभाग जागोजागी फोफावले आहेत.असुन अटक झाल्यानंतर जामीन मिळवुन पुन्हा घुटका विक्रीकडे वळत असल्याचे वास्तव्य चित्र बघायला मिळत आहे. महिला आजच्या स्थितीत विविध क्षेत्रात विविध पदावर आरूढ होत आहेत. शहरी महिलांच्या बरोबरीने ग्रामीण महिला देखिल सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन सक्षम होताना दिसत आहे. असे असताना शहरी व ग्रामीण महिलांना माञ चांगले आणि वाईट याची परिभाषा कळली नसल्याने तंबाखू जन्य पदार्थापासून निर्माण होणाऱ्या गुटख्याच्या आहारी जाताना दिसत आहे. एकीकडे आरोग्य जपण्यासाठी महागड्या औषधीचा वापर करीत असताना माञ दुसरीकडे महिला गुटख्याच्या विळख्यात सापडणे ही दुर्दैवी बाब आहे. यातुन बाहेर काढण्यासाठी प्रबोधन करणे काळाची गरज आहे.
