मारिया महाविद्यालय मूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

मारिया महाविद्यालय,मूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला गेला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर सुकारे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. उमेश यातकलेवार हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये मार्गदर्शन करताना सांगितले की, अध्यात्माला विज्ञानाची सांगड घालून कार्य करणे आवश्यक आहे श्रद्धेमध्ये एक अलौकिक शक्ती असते परंतु श्रद्धेला अंधश्रद्धा करू नये विज्ञान रुपी विचाराने कार्य केले तर देशाचा सर्वागीण विकास घडून येईल.  समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या' अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. प्रमुख मार्गदर्शक प्रा. उमेश याद कर ले वर यांनी आपल्या मार्गदर्शनात रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. असे विचार व्यक्त केले. हा राष्ट्रीय विज्ञान दिन यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित राहून सहकार्य केले. या कार्यक्रमाच सूत्रसंचालन प्रा. गीतांजली मशाखेत्री तर आभार प्रा. वैशाली साळवे यांनी केले.