कर्मवीर महाविद्यालयाची सांस्कृतीक युवा महोत्सवात भरारी




रवि वाळके/ दे दणका न्यूज मूल 



    गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव भरारी 2024-25 चे आयोजन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे  करण्यात आले होते.या महोत्सवात कर्मवीर महाविद्यालय मूल चे विदयार्थी विविध स्पर्धामध्ये सहभागी झाले.विद्यार्थ्यांनी अतुलनीय कामगिरी करत  सर्वाधिक सांघिक गुण मिळवून कर्मवीर महाविद्यालयाने साहित्य सांघिक चषक जिंकला.
    आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत अविनाश चहारे आणि सिध्दी अलोने यांनी प्रथम क्रमांक पकावला.वक्तृत्व स्पर्धेत  सिध्दी अलोने हिने प्रथम क्रमांक पटकावला,तर प्रश्र्नमजुषा स्पर्धेत संघर्ष गजभिये, सोहन महाडोरे, ओम चेपुरवार या चमूने प्रथम क्रमांक पटकावला.एकांकिका  स्पर्धेत दुसरा क्रमांक आला.यात योगेश सिडाम,साक्षी येरमे,
निखिल सोपनकार,अस्मिता नागपुरे,अविनाश चाहारे यांचा सहभाग  होता.   या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मान.अॅड अनिल वैरागडे,प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी विजेत्या स्पर्धकांचे  अभिनंदन केले आहे.