रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
मूल तालुका सरपंच संघटनेच्या वतीने माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना आज दिनांक 15-2-2025 रोज शुक्रवार ला चंद्रपूर येथे मुल तालुक्यातील 24 गाव ग्रीड योजना आणि प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही मागील 2 महिन्या पासून बंद आहे तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अकुशल आणि कुशल ही दोन्ही कामे बंद करण्यात आले या बाबतीत निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देताना सरपंच संघटना मुल तालुका अध्यक्ष श्री राहुल मुरकुटे,उपाधक्ष्य रणजित समर्थ, गडीसुरला येथील माजी सरपंच संजय भाऊ येनुरकर, अमोल भाऊ चुधरी माजी उपसभापती प. स.मुल तसेच तालुक्यातील सरपंच हिमानीताई वाकुडकर ,गोपिकाताई जाधव , धीरज गोहने, प्रितीताई भांडेकर, यशवंत खोब्रागडे, रोशना लोडे, शारदाताई येनुरकर,वैशालीताई निकोडे, मीनल ताई लेनगुरे,मेघाताई मडावी, दर्शना ताई किंनाके, योगिताताई गेडाम, किरमे ताई, ज्योत्स्नाताई पेदोर, अनुराधा ताई नेवारे शांताबाई गेडाम ,साहिल येनगंटीवार,जगदीश भाऊ बांगरे इत्यादी सर्व सरपंच हजर होते.
