चिरोली येथे रेतीची तस्करी ! चोरट्या मार्गाने रेतीची साठवणूक , तलाठ्याचे दुर्लक्ष



 

रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

तालुक्यातील चिरोली येथे रस्ते, नाल्या व घराचे काम सुरू असल्याने रेतीची मागणी वाढली आहे. त्यामुळे रेती तस्कर सक्रिय झाले असून केळझर अंधारी नदीतील रेती चोर मार्गाने चोरी करून तलाठी कार्यालयाजवळील रस्त्यावर साठवणूक केली जात आहे. रेती तस्कराचे तहसीलदार व तलाठ्यांशी मधुर सबंध असल्याने रेती तस्कर खुलेआम रेतीची चोरी केली जात आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा महसुलाचे नुकसान होताना दिसत आहे. माञ तालुका प्रशासन गंभीर नसल्याचे या प्रकारावरून दिसुन येत आहे.
   
  ग्राम पंचायत चिरोली अंतर्गत करोडो रुपयांची कामे मंजूर असुन त्या कामांना सुरवात झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरूस्ती असो की रस्ते व नालीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी लाखो रुपयांची रेती आवश्यक आहे. तसेच खाजगी व घरकुलाचे कामे देखील सुरू आहेत. याच संधीचा फायदा घेत रेती सक्रीय झाले असून केळझर नदीतील रेती आडमार्गाने भर दिवसा व रात्री रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने रेतीची साठवणूक तलाठी कार्यालयाजवळ केली जात आहे.तलाठी मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. दररोज लाखो रुपयांची रेती चोर मार्गाने नेली जात असल्याने नदीत खोल खड्डे पडले असून काही दिवसात संपूर्ण नदी सपाट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होणार असुन रेती तस्करांना अभय देणाऱ्या तलाठ्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच रेती तस्करांच्या मुसक्या आवळणे गरजेचे झाले आहे. याकडे तहसीलदार कोणती कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.