कांतापेठ येथे रेतीचा साठा कुणाचा?



जनतेचा शासनाला सवाल 

रवि वाळके /दे दणका न्यूज मूल 

शासनाने रेतीचा लिलाव न केल्याने रेतीसाठी चोरीचा मार्ग रेती तस्कर अवलंबित असून मूल तालुक्यातील कांतापेठ रस्त्यावर रेतीचा मुबलक प्रमाणात साठा दिसुन येत आहे. यावरून परिसरातील नदी घाटावरून रात्रीच्या वेळेस शासनाच्या डोळ्यात धुळ झोकत रेतीची चोरी केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तहसील प्रशासनाचे पथक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
     मूल तालुक्यात घरकुलासह अनेक शासकीय व खाजगी कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने रेतीची तस्करी करून साठवणूक केली जात आहे. असाच काहीसा प्रकार मुल तालुक्यातील कांतापेठ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा दिसुन येत आहे. या मार्गावर जानाळा ते पोभुर्णा महामार्गाचे काम सुरू असल्याने कंत्राटदार रेतीची साठवणूक करीत आहे की इतर कामासाठी वापरण्यासाठी करीत आहे ? हे कळण्यास मार्ग दिसुन येत आहे. तालुका प्रशासनाने याकडे लक्ष घालुन हा मोठ्या प्रमाणात असलेला रेतीच्या साठ्याची चौकशी करण्यात यावी व अवैध रित्या रेतीची साठवणूक केली असल्यास संबंधितावर कारवाई करून दंड आकारण्याची मागणी परिसरातील जनतेनी केली आहे.