नागरिकांचा सवाल
निधीअभावी अडले तलावाचे सौंदर्यीकरण!
चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा मूल तलावाचे सौंदर्योकरण चांदा ते बांधा या योजनेतून बसस्थानकाजवळील करण्याचा संकल्पकरण्यात आला होता.या कामामुळे शहराला वेगळे रुप येऊन मध्यवर्ती ठिकाण बनावे यासाठी तलावाच्या सौंदर्याकरणासाठी ४९८.९७ लाख रूपयांचे अंदाजपञक जलसंपदा विभागाने सन २०१५-१६ ला सादर केले.मंजुरीनंतर प्रत्यक्षात सन २०१८-१९ या वर्षात कामाला सुरवात करण्यात करून आली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नागपूर च्या देखरेखीखाली सदर काम सुरू करुन ३ कोटी रूपये खर्च करण्यात आले. मात्र निधी अपुरा पडला. सदर योजना चांदा ते बांधा योजनेअंतर्गत होती. ही
योजना बंद झाल्याचा फटका तलाव सौदर्यकरणावर बसला असुन काम अर्धवट झाले असुन गेल्या ४ वर्षापासून काम थंडबस्त्यात आहे. या सौंदर्यीकरणात तलावात नौकायान करण्याची सोय केली होती. मात्र ती सोय देखील धूसर झाली असल्याने नागरीक नाराज झाले आहे . त्यामुळे सुधीर भाऊ , आम्ही नौकायान केव्हा करणार ? असा सवाल नागरिकांनी केली आहे .
जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखाली येत असल्याने मूल येथील. बसस्थानक जवळील तलावाचे सौंदर्याकरण करण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाने तयार केला. तलावाची खरीप हंगामाची सिंचन क्षमता १९२ हेक्टर इतकी आहे. या तलावात नोका विहाराची सुविधा, उद्यानाची निर्मिती, मुर्ती विसर्जनाच्या ठिकाणी बोटींग प्लॅटफार्मची निर्मिती,नविन रस्ते, उद्यानात कारंजे, लहान मुलांसाठी बालोद्यान, प्रसाधनगृह, विद्युतीकरण, पाणीपुरवठा आदीची सोय केली जाणार आहे. याच बरोबर नविन रस्त्यावर वृक्षारोपण, विद्युत पथदिव्याची उभारणी केली जाणार आहे. तलावाच्या सौंदर्याकरणामुळे नागरिकांना विरंगुळा तसेच फिरणे बसण्यासाठी अप्रतिम स्थळ बनविले जाणार आहे. या उद्यानात शिवाजी महाराज उद्यान असे नाम करण नगर परिषदेने केले आहे.याच बरोबर शेतकर्याना शेतीला पाणी व कोळी बांधवांना मत्स्य व्यवसाय सुव्यवस्थित केला जाणार आहे. शेती व मत्स्य व्यवसायाला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याबाबत अभ्यासपूर्ण केल्यानंतर या कामाला सुरवात करण्यात आली आहे. तलावाचे सौंदर्याकरण मूल शहराला नविन कलाटणी देणारा ठरणार असल्याने मूल शहर वासियाना उत्सुकता निर्माण झाली होती.प्रथमतः कामाचा वेग वाढला होता.त्यामुळे काम पुर्णत्वास येईल अशी आशा व्यक्त केली जात होती.मात्र निधी संपल्याने काम बंद करावे लागले.या संदर्भात जिल्हाधिकारी चंद्रपुर च्या मार्फतीने सबंधित मंत्रालयात चार वर्षांपूर्वी पाठविण्यात आले असुन तलावाच्या सौंदर्याकरणासाठी उर्वरित निधीची मागणी करण्यात आली आहे.माञ सदर चांदा ते बांधा ही योजना बंद झाल्याने त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. निधीच्या उपलब्धतेवरच सौदर्यकरणाचे काम अवलंबुन आहे. याकडे चंद्रपूर जिल्हाचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष घालुन रगडलेले तलावाचे सौंदर्यो करण पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
