मूल येथे पार पडले संस्कृतिक महोत्सव
रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
सर्वच विद्यार्थ्यांत उपजत गुण असतात ते प्रदर्शित होण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यता असते. ठरविलेले ध्येय साध्य करण्यासाठी कुणीही नकारार्थी बोलले तर त्याकडे लक्ष न देता विचलीत होऊ नका असे भावनिक आवाहन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे आयोजित संस्कृतिक महोत्सवात उद्घाटनपर भाषणात केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारण मंडळ मूल चे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे. कार्याध्यक्ष अशोक कडुकर, सचिव अविनाश जगताप, पद्माकर इंगोले, प्रशांत जगताप,
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले, नगर परीषद मूल चे. गटनेते मोतीलाल टहलियानी, सामाजिक कार्यकर्ते नरेश मारकवार, सुवर्णाताई पिंपरे, इंदुताई मडावी, उषाताई थोरात, डेव्हिड खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रभाकर भोयर ,प्रा मारोतराव पुल्लावार, उषाताई शेंडे, सुखदेव चौथाले, अमोल चूधरी, आकाश मारकवार, गणेश मांडवकर आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्य करणाऱ्या प्रा. महेश पानसे, उमेशसिंह झिरे, अमित राऊत, सुनिल कुकुडकर, प्रब्रम्हानंद मडावी, गौरव श्यामकुळे यांचा शाल,सन्मानचिन्ह देऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
