नगर परिषद मूल प्रशासनाचे दुर्लक्ष
रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
लाखो रुपये खर्च करून मूल शहरात असलेल्या ओपन स्पेस विकसित करण्यात आली असली तरी त्याची देखभाल करणे हे नगर परिषद मूल चे काम असताना देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
थोरा मोठ्यांचा व लहान बच्चे कंपनीचा विरंगुळा व्हावा यासाठी वृक्षा सोबतच खेळाचे साहित्य लावण्यात आले. नव दिवस नवलाईचे या उक्ती प्रमाणे नगर परीषद प्रशासन वेळोवळी लक्ष देवुन देखरेख केली जात होती. त्यामुळे परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. माञ मागील वर्षापासुन त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ओपन स्पेस मध्ये कचरा वाढण्यासोबतच झाडांची दुरावस्था झाल्याचे दिसुन येते. त्यामुळे विकसित झालेले ओपन स्पेस भकास झाल्याचे दिसुन येत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मूल शहरातील ले आऊट मधील असलेले ओपन स्पेस भूमाफिया त्याची वाट लावुन विकण्याचा गोरखधंदा सुरू केल्याने ले आऊट धारकांना मनोरंजनासाठी ओपन स्पेस राहणार नाही ही बाब लक्षात घेता नगर परीषद प्रशासनाने पुढाकार घेत उर्वरित असलेले ओपन स्पेस आपल्या ताब्यात घेतले. व ते विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला. यात लाखो रुपये खर्च करून संरक्षणभिंत सोबतच वृक्षांची लागवड व खेळाचे साहित्य लावण्यात आले. त्यामुळे विरंगुळा करण्यासाठी आबाल वृद्ध व्यक्तीसोबत लहान मुलांना देखील मनोरंजनासाठी उपयोगी येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. माञ गेल्या वर्ष भरापासून नगर परीषद प्रशासनाने लक्ष देण्यास पुढाकार घेतला नसल्याने ओपन स्पेस परिसरात कचरा वाढलेला आहे. पाण्याअभावी झाडांची दुरावस्था झाली आहे.खेळाच्या साहित्याचीमोडतोड झाल्याचे दिसुन येते.मनोरंजनासाठी उपयोगी झालेला ओपन स्पेस सध्या नगर परीषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे भकास झाल्याचे चित्र दिसत आहे. याकडे लक्ष घालुन ओपन स्पेसला नवीन रूप देण्याची गरज आहे. अन्यथा लाखो रुपयाचा झालेला खर्च निरर्थक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
