रवि वाळके /दे दणका न्यूज मूल
सिंचन व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाने असोलामेंढा गोसीखुर्द प्रकल्प कार्यालय सावली अंतर्गत मूल तालुक्यातील चांदापूर येथील नहर दुरुस्तीचे मागील वर्षात करण्यात आले. मागील वर्षात देखील शासनाने रेतीचा लिलाव न केल्याने रेतीची
आवश्यकता भासत होती. असे असताना देखील कंत्राटदाराने आडमार्गाने अवैध रेती विकत घेऊन काम केले होते. मुबलक प्रमाणात रेतीचा वापर न
केल्याने कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे दिसुन येत आहे. करोडो रुपये खर्च केल्यावर नहर दुरुस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे होणे ही शोकांतिका आहे. त्यामुळे कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी असोलामेंढा गोसीखुर्द प्रकल्प कार्यालय सावली अंतर्गत नहर दुरुस्तीचे काम सन २०२३ -२४ या वर्षात करण्यात आले. त्यावेळी रेतीचा लिलाव न झाल्याने रेती मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली होती. माञ काम करणे आवश्यक असल्याने कंत्राटदाराने
आड मार्गाने रेती घेऊन बिल निघण्याच्या घाईत नहर. दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र रेती कमी प्रमाणात वापरल्याने थातुरमातुर रेतीचा वापर करण्यात आला. त्यामुळे कामाचा दर्जा निकृष्ठ दर्जाचा झाला .त्यामुळे अनेक कालव्याना भेगा पडत आहेत. तसेच काम करण्यात आलेल्या स्थळी नावाचे फलक न लावल्याने कोणते काम व किती रुपये खर्च झाले याची माहिती मिळत नसल्याचे दिसुन येते.कुणालाही हे कळू नये यासाठी कंत्राटदार चोर पावलांनी हे कालवा दुरुस्तीचे काम करून करोडो रुपये घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकडे लक्ष घालुन चौकशी करण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गानी केली आहे.
