रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
तालुक्यातील हळदी येथे झाडाच्या फांद्या तोडण्याच्या वादातून कुऱ्हाडीने झालेला खून असो, गुंडांना बोलावून मूल शहरातील येथील प्रेम कामडे या चुलत भावाच्या मुलाची हत्या असो की रीतिक शेंडे याचा खून असो या
घटनांच्या निमित्याने गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. या घटनेने अख्ख्या तालुका भयभीत झाल्याचे चित्र दिसत निर्माण झाले. आजच्या स्थितीत नशेसाठी गांजा सिगारेट मध्ये पिण्याचे प्रमाण वाढले असुन प्रत्येक पान ठेल्यावर युवकाची सिगारेट घेण्यासाठी चढाओढ असल्याचे दिसून येते. ही मूल शहरात शांत असलेल्या शहरात चिंतेची बाब असुन गुन्हेगारीला खतपाणी दिले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या असल्या प्रकारातून गुन्हेगारीचाआलेख वाढत आहे.हीच चिंतेची बाब ठरत असुन पोलीस प्रशासनाने वाढणाऱ्या गुन्हेगारीवर अंकुश लावणे आवश्यक झाले आहे.
मूल शहरातील वाढत्या गुन्हेगारीकरणामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या होणा-या हिंसक घडामोडीमुळे तालुक्यात दहशतीचे चित्र तयार होत आहे. गुंडगिरी करणा-या युवकाचे टोळके पानठेल्यांवर बसून चिडीमारी करीत असल्याने त्यातून शहरातील वातावरण बिघडत चालले आहे. ठिकठिकाणी असणा-या शहरातील पानठेल्यांवर असे टोळके शिगारेटचे धुरके सोडताना अनेकाच्या निदर्शनास आहे. शालेय आणि महविदयालयीन मुलींना पाहून बाईक धुम स्टाईल पळविणे, अश्लील बोलणे, शाळा, महाविदयालय सुटण्याच्या वेळेस येरझारा मारणे अशा विविध कारणांमुळे गुंडगिरी वाढत चालली आहे. याकडे स्थानिक पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गुंडगिरी करणा-या युवकांची हिंमत वाढत चालली आहे. मूल शहरामध्ये विविध ठिकाणी चरस गांजा गुटखा यांचा अवैध वापर आणि विक्री होत असल्याचे बोलल्या जाते. त्यातूनच मूल शहरात गुंडगिरी वाढत असुन गांजा पिण्यासाठी सिगारेटची मागणी वाढली असुन पान ठेल्यावर युवकाची गर्दी बघायला मिळत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
