सुशी परिक्षेत्रात लावलेली ११ लाख वृक्षापैकी मोजकीच रोपे जगली ! वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष





रवि वाळके / दे दणका न्यूज मूल 

     पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम वनविभाग घेत असतो. त्यांची योग्य निगा व देखभाल केली तर नक्कीच लावलेली सगळीच रोपे जगू शकतात. माञ याकडे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रुपये खर्च करून लावलेली रोपे करपली जातात. असाच काहीसा प्रकार चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील सुशी नियत परिक्षेत्रात दिसत आहे. सन २०२३ मध्ये कक्ष क्रमांक ६७४ मधील १० हेक्टर क्षेत्रात ११ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले. या दोन वर्षाच्या काळात काही मोजकीच झाडे जिवंत असल्याचे दिसुन येते. यावरुन कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार दिसुन येत आहे.
     भविष्यात प्राणवायूची आवश्यकता सर्वांनाच भासणार असुन वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. हे ओळखुन वनविभागाबरोबरच सामाजिक संस्था, शाळा पुढाकार घेत असतात. शाळा व स्वंयसेवी संस्था प्रयत्न करतात. माञ जास्त जबाबदारी वनविभागाची असते. कारण त्यांना खड्डा खोदण्यापासुन तर वृक्ष संवर्धन करण्यासाठी रक्कम मिळत असते. तसेच एकुण पाच वर्ष देखभालीसाठी लाखो रुपये खर्च केली जातात. चिचपल्ली वनपरिक्षेत्रात सन २०२३ ला वानिकरणाचा भरगच्च कार्यक्रम अंतर्गत सुशी नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ६७४ मध्ये एकुण १० हेक्टर वर ११ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवडीने परिसरातील गावातील लोकांना प्राणवायू मिळण्यास मदत होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.मात्र या दोन वर्षांत बोटावर मोजण्याइतके वृक्ष दिसत आहे.दर वर्षाला देखभाल करण्यासाठी लाखो रुपये खर्च केल्या जात असते. एवढे असताना देखिल 
चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, केळझरचे क्षेत्र सहाय्यक आर . एस.पडवे हे कानाडोळा करीत शासनाच्या लाखो रुपयाला चुना लावत असल्याची चर्चा परिसरात आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुशी नियत क्षेत्रात लावलेल्या वनीकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.