रवि वाळके/दे दणका न्यूज
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सहजयोग ध्यानसाधना तसेच बोर्ड परीक्षेत गैरमार्गाविरोधी लढा या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये ध्यानसाधनेच्या माध्यमातून परीक्षेतील यशस्विता आणि मानसिक स्थैर्य राखण्याच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिता वाळके होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर उपस्थित होते. विशेष मार्गदर्शन प्रा. वाकडे (नेहरू कनिष्ठ महाविद्यालय, चिमूर) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर मासिरकर यांनी प्रभावीपणे पार पाडले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली व मौनाचे महत्व विषद केले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. वाकडे यांनी
विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील यशासाठी सहजयोग ध्यानसाधनेचे महत्त्व
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावावर मात करण्यासाठी आणि अभ्यासात अधिक एकाग्रता साधण्यासाठी सहजयोग ध्यानसाधनेचा उपयोग कसा करावा याचे प्रत्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले . ध्यानसाधना केल्याने विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते, आत्मविश्वास मजबूत होतो तसेच परीक्षेदरम्यान सकारात्मक मानसिकता विकसित होते, असे मार्गदर्शकांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांनी
परीक्षेत गैरमार्ग अवलंबल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव,
विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता आणि प्रामाणिकतेच्या मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी यासाठी परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केल्यास होणारे नुकसान यावर प्रकाश टाकला . गैरमार्गाने मिळवलेले यश क्षणिक असते आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकू शकत नाही . त्यामुळे परीक्षेला संपूर्ण प्रामाणिकपणे सामोरे जाण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा, असा संदेश या कार्यक्रमातून दिला .
कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. सहजयोग ध्यानसाधनेचा थेट अनुभव घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण कमी करण्याचे तंत्र, आरोग्य सुधारण्याचे मार्ग आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्याचे महत्त्व याची जाणीव झाली. महात्मा गांधी यांच्या विचारांचा अंगीकार करून सत्य, अहिंसा आणि प्रामाणिकतेच्या मार्गाने यशस्वी भविष्यासाठी वाटचाल करण्याचा संकल्प अनेक विद्यार्थ्यांनी केला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रागीताने करण्यात आली.
