मा. सा. कन्नमवार जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; विजेत्या व सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण मूल प्रतिनीधी मूल येथील बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे 125 वी जयंती सोहळा मुल येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर मनोहरराव मुद्देशवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कारगिलवार होते. तर प्रमुख अतिथी डॉक्टर सुभाष रेड्डीवार मारोतराव फुल्लावार आदी उपस्थित होते. याप्रसंगी दहावी बारावी मधील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी, तथा डॉक्टर वैशाली बेझलवार आणि नायब तहसीलदार विकास जीडगलवार यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी एकल व समुह नृत्य आणि विविध स्पर्धा घेण्यात आला. त्याचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

मा. सा. कन्नमवार जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्र0मांची मेजवानी; विजेत्या व सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण

मूल  प्रतिनीधी 

मूल येथील बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे 125 वी जयंती सोहळा मुल येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर मनोहरराव मुद्देशवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कारगिलवार होते. तर प्रमुख अतिथी डॉक्टर सुभाष रेड्डीवार मारोतराव फुल्लावार आदी उपस्थित होते. याप्रसंगी दहावी बारावी मधील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी, तथा डॉक्टर वैशाली बेझलवार आणि नायब तहसीलदार विकास जीडगलवार यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी एकल व समुह नृत्य आणि विविध स्पर्धा घेण्यात आला. त्याचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.