सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे पार पडला बाल विज्ञान मेळावा !
आजचे युग हे
विज्ञान युग असल्याने नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. त्यामुळे शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना
विज्ञानाची तंत्रे विकसित करणे गरजेचे आहे. हे काम सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलचे विद्यार्थी करीत असल्याने अत्यानंद झाला . भविष्यातील ही पिढी नक्कीच नवा अविष्कार घडवतील असा विश्वास असल्याचे मत नगर परिषद मूल चे मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या वतीने आयोजित दोन दिवसीय बाल
विज्ञान मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून व्यक्त केले. या बाल विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समिती मूलच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री गुज्जनवार यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारण मंडळ मूल चे कार्याध्यक्ष अशोकराव कडूकर होते. तर
विशेष अतिथी म्हणुन मूल पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सुबोध वंजारी, कृषी महाविद्यालय मूल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, विद्या प्रसारण मंडळ मूल चे सहसचिव पद्माकर इंगोले तर प्रमुख अतिथी म्हणून
शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष मारोतराव पुल्लावार, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सुवर्णा पिपरे, माता पालक समितीच्या अध्यक्षा गायत्री मडावी, पालक समितीचे अध्यक्ष नरेंद्र कामडे, सखी सावित्री समितीच्या उपाध्यक्ष इंदू मडावी,
ग्राम गीताचार्य तथा सल्लागार समितीचे सदस्य गणेश मांडवकर, ग्रामगीतचार्य तथा समितीचे सदस्य
सुखदेव चौथाले, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य युवराज चावरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य तथा माजी नगराध्यक्ष उषाताई शेंडे,
माजी सैनिक तथा शाळा सल्लागार समितीचे सदस्य मारोती कोकाटे,
तज्ञ मार्गदर्शक प्रा. महेश पानसे,
तज्ञ मार्गदर्शक तथा सदस्य
विजय वैरागडवार, शाळा सल्लागार
समितीचे सदस्य
रूपेश पाटिल मारकवार , नरेश गणवेनवार, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक राजू गेडाम आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून बाल मेळाव्याचे महत्व सांगितले. यावेळी नर्सरी ते इयत्ता 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी एकूण 68 विज्ञान मॉडेल तयार करून उत्तम रित्या सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक बंडू अल्लीवर, प्रास्ताविक मुख्याध्यापक अविनाश जगताप तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षक योगेश पुल्लकवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
