सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे उद्या बाल विज्ञान मेळावा




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना व वैज्ञानिक  विचारांना वाव देण्यासाठी सुभाष उच्च प्राथमिक बाल विज्ञान मेळावा 2025-26 चे आयोजन  
दिनांक 11 डिसेंबर 2025 ते 12 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आले आहे.बाल विज्ञान मेळाव्याचा 
मुख्य विषय दैनंदिन जीवनातील विज्ञान असुन या मेळाव्याचे 
उद्घाटन दिनांक  11 डिसेंबर 2025 रोज गुरुवार ला दुपारी 12:00 वाजता सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे करण्यात आले आहे. पंचायत समिती मूल च्या गटशिक्षाधिकारी 
 जयश्रीताई गुज्जनवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष 
 नरसिंगभाऊ गणवेनवार असणार आहेत.
विशेष अतिथी म्हणुन नगर परिषद मूल चे मुख्याधिकारी 
 संदिप दोडे, पोलीस निरीक्षक विजय राठोड, उपजिल्हा रुग्णालय मूल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बंडू रामटेके,
कृषी महाविद्यालय मूल चे 

सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, सावलीचे तालुका कृषी अधिकारी ललित राऊत, शूरवी महिला महाविद्यालय मूल च्या प्राचार्य  हर्षा खरासे, विद्या प्रसारण मंडळ मूल चे कार्याध्यक्ष 
 अशोकराव कडुकर, सहसचिव 
 प‌द्माकर इंगोले, शाळा सल्लागार समितीचे सदस्य 
प्रा. चंद्रकांत मनियार, 
 तज्ञ मार्गदर्शक प्रा. महेश पानसे,
ॲड .अनंत बल्लेवार, सदस्य, 
 रूपेश पाटिल मारकवार तसेच सर्व समित्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मूल शहरातील शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित राहावे असे आवाहन सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल चे मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी केले आहे.